धन्यकुमार शेटे : कुर्ली हायस्कूलमध्ये अटल विज्ञान प्रदर्शन निपाणी (वार्ता) : शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या उद्देश्याने निती आयोगाने अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब हा प्रयोग देशभरात सुरू केला आहे. नव्या तंत्रज्ञानाची ओळख होवून समाज उपयोगी साधने निर्माण करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जात आहे. …
Read More »फटाक्यांच्या गोदामाला आग; 11 जणांचा मृत्यू
बेंगळुरू-होसूर आंतरराज्य महामार्गावरील अटीबेले येथील घटना अनेकल (बेंगळुरू) : कर्नाटकातील अनेकल तालुक्यातील बेंगळुरू-होसूर आंतरराज्य महामार्गावरील अटीबेले येथे शनिवारी फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी क्रॅकर्स येथे ही दुर्घटना घडली जेव्हा एका छोट्या ठिणगीमुळे संपूर्ण दुकानाचा स्फोट झाला. या घटनेतील मृतांची ओळख अद्याप …
Read More »बांगलादेशचा अफगाणिस्तानवर सहा विकेट्स राखून विजय
धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : मेहदी हसन मिराझची शानदार अष्टपैलू खेळी (3-25 आणि 57 धावा), शकीब अल हसनच्या (3-30) आणि नजमुल शांतोच्या 58 नाबाद खेळीच्या जोरावर धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने अफगाणिस्तानवर सहा विकेट्स राखून विजय मिळवत वर्ल्डकपमध्ये शानदार सुरुवात केली. बांगलादेशने वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला अवघ्या 156 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर 34.4 …
Read More »वजनात फसवणूक आढळल्यास कायदेशीर कारवाई : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आश्वासन
बेळगाव( वार्ता) : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू हंगामातील ऊस तोडणी हंगाम 1 नोव्हेंबरनंतर सुरू करावा. कारखानानिहाय रास्त व किफायतशीर (एफआरपी) दर संबंधित कारखान्यांच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक आहे. वजनात फसवणूक आढळल्यास कारखान्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. 2023-24 चा ऊस तोडणी हंगाम …
Read More »1 नोव्हेंबरनंतरच ऊसाचा हंगाम सुरू करा
जिल्हाधिकारी नितेश पाटील; साखर कारखाना पदाधिकारी एमडींची बैठक बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 1 नोव्हेंबरनंतरच ऊस गाळप सुरू करावे. सर्व कारखान्यांनी शासन आदेशाचे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कारखान्यांना दिल्या. 2023-24 चा ऊस तोडणी हंगाम सुरू होण्यासंदर्भात शनिवारी (7 ऑगस्ट) शहरातील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट …
Read More »कबड्डीमध्ये पुरुषांची सुवर्ण कामगिरी, अंतिम फेरीत गतविजेत्या इराणला पराभूत करुन भारताने रचला इतिहास
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे. यामुळे भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडलीये. भारताने अंतिम सामन्यात इराणचा 33-29 असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला. हा सामना जिंकून यंदाचा आशिया स्पर्धांमधील कबड्डीचा …
Read More »धावण्याच्या स्पर्धेत सुशील कुमार मऱ्याप्पा पाटील याचे सुयश
खानापूर : महाराष्ट्रीय राज्य पुणे मुक्कामी मंडळ यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय इंटर स्कूल स्पर्धा 26-09-2023 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत बारा वर्षाखालील इयत्ता चौथी मध्ये शिकणारा कु. सुशील कुमार (मुळगाव गुंडपी तालुका खानापूर) याने 60 मिटर व 80 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन दोन्ही गटामध्ये द्वितीय क्रमांक रौप्य पदक पटकाविले …
Read More »बेळगावात हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदान करा
बेळगाव : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही. तसेच बुडाच्या सर्व साधारण बैठकीत 2020 मध्ये कणबर्गी येथे 8 एकर जागा मंजुरीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे परंतु यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने …
Read More »मागील ४०० रुपयाशिवाय ऊस तोडू देणार नाही
राजू शेट्टी : सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निपाणी (वार्ता) : गतवर्षी एफआरपीवर आधारित ऊस दराची मागणी केली होती. मात्र त्यानंतर बाजारपेठेत साखरेचे दर ३२०० ते ३८०० वर पोचल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रुपये प्रति टन चा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे. याशिवाय इथेनॉल पासूनही कारखान्यांना जादा रक्कम मिळाली आहे. त्यामुळेच …
Read More »भुरूनकी येथे गांजा विक्री करणाऱ्यास अटक
खानापूर : खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजा विक्री सुरू आहे. नंदगड जवळील भुरूनकी क्रॉस येथे महादेव रामप्पा बेटगेरी नामक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती नंदगड पोलिसांना मिळताच सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीला पोलीस कोठडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta