Tuesday , September 22 2026
Breaking News

Belgaum Varta

सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना लक्ष्य!

  बेळगाव : डिजिटल अरेस्टच्या प्रकारानंतर सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना आपले लक्ष्य बनविले आहे. पोषण अभियान अंतर्गत नावे नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांच्या बँक खात्यातील रक्कम गायब करण्याचा सपाटाच गुन्हेगारांनी सुरू केला असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. गेल्या आठवड्याभरात बेळगाव शहर व उपनगरात आठहून अधिक गर्भवती महिलांच्या बँक खात्यातून …

Read More »

जळीत ऊसाला भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन

  रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार: हेस्कॉम अधिकारी, रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यात हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यासह मुख्यमंत्री पर्यंत निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. पण आजतागायत ही भरपाई मिळालेली नाही. तात्काळ ही भरपाई …

Read More »

राहुल गांधींचा टेम्पो चालकाच्या घरात पाहुणचार अन् दिलखुलास गप्पा

  कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले. परंतु या कार्यक्रमापेक्षा राहुल गांधींनी एका छोट्या कार्यकर्त्याच्या घरी दिलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. सकाळी साडे आठ …

Read More »

मराठी विद्यानिकेतन येथे राष्ट्रसेवादल शिबिर संपन्न

  सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा सामंत यांची उपस्थिती बेळगाव : दिनांक 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर पर्यंत सुरू असलेल्या मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रसेवा दलाच्या शिबिराची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पत्रकार, दिग्दर्शक व झी मराठीचे …

Read More »

मराठी, इंग्रजी फलक हटवण्यासाठी मनपावर करवेचा दबाव

  बेळगाव : शहरात गणेशोत्सव आणि दसरोत्सवामुळे मराठी आणि इंग्रजी भाषेत फलक लागले असल्यामुळे पोटशूळ उठलेल्या करवे यांनी शुक्रवारी (दि. ४) पुन्हा कोल्हेकुई करत महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे पुत्र राहुल यांच्या वाढदिवसाच्या फलकावर कन्नड फलक लावून कंडू शमवून घेतला. शहर परिसरात मराठी आणि इंग्रजी …

Read More »

शिरोली वृक्षतोडीबाबत सखोल चौकशी करावी

  खानापूर : लोंढा वन क्षेत्रामध्ये शिरोली ग्रामपंचायत सर्व्हे क्रमांक ९७ मध्ये बेकायदा ११ जातीच्या वृक्षांची दहा दिवसांपूर्वी तोड करण्यात आली. याबाबत तक्रार दाखल करण्यास वनविभागाकडून विलंब होत आहे. याप्रकरणी सरकारने उच्चस्तरीय अधिकाऱ्याची नेमणूक करून सखोल चौकशी करावी, याबाबत वनमंत्र्यांना खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन देऊन कारवाई करावी, अशी मागणी करणार …

Read More »

छत्तीसगडमध्ये तब्बल ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा

  नारायणपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे सुरक्षा …

Read More »

हिंडलगा ग्राम पंचायतीने केली मालमत्ता करात १० टक्के वाढ

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या वतीने मालमत्ता करात १० टक्के वाढ केल्याने ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीला घेराव घालून संताप व्यक्त केला. हिंडलगा गावात मालमत्ता करात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे हित न जपणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा काय उपयोग असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ग्रा पं सदस्यांनी …

Read More »

दुर्गामाता दौडीमुळे निपाणी शिवमय

  तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व उत्साह ; शिवाजी महाराजांच्या वेषात स्वागत निपाणी (वार्ता) : दौडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या, पुष्पष्टी, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, युवकांसह बालचमूंचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी (ता.४) येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाची दुर्गामाता दौड काढण्यात आली. यावेळी युवकांसह युवतींनी भगवे फेटे परिधान केल्याने निपाणी शिवमय बनली होती. …

Read More »

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने निपाणी परिसरात आनंदोत्सव

  निपाणी (वार्ता) : मराठी ही मुळातच अभिजात भाषा असतानाही त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता.‌ या संदर्भात केंद्र शासनाचे जे निकष असतात ते निकष पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सखोल अभ्यास करून आवश्यक सर्व अटींची पूर्तता करून केंद्र शासनाला आपला …

Read More »