Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

जोयड्याचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांचे निधन

  खानापूर : खानापूर येथील तहसीलदार कार्यालयात गेली अनेक वर्षे उपतहसीलदार म्हणून कार्य केलेले व सध्या कारवार जिल्ह्यातील जोयडा येथील तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांचे सोमवार पहाटे अडीचच्या दरम्यान बेळगाव येथील केएलई हॉस्पिटल निधन झाले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच आरोग्य बिघडल्याने चव्हाण हे हॉस्पिटलला दाखल झाले होते. राजेंद्र चव्हाण हे एक …

Read More »

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, कांगारुंना नमवत मालिकाही घातली खिशात

  इंदूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९९ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्याच्या मालिकेत २-० अशा फरकाने विजयी आघाडी घेतली. तत्पूर्वी या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी आलेल्या भारतीय …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार!

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजता माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह, राजा शिवछत्रपती स्मारक येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा तसेच खानापूर तालुक्यातुन निमलष्करी दलात दाखल झालेल्या मराठी भाषिक तरूणींचा तसेच कु. सिध्दी उत्तमराव कदंब-पाटील …

Read More »

सभासदांच्या हितासाठी संस्था प्रयत्नशील : बाळकृष्ण मगदूम

  निपाणी (वार्ता) : निपाणी को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट संस्थेमध्ये पदाधिकारी निस्वार्थीपणे कार्यरत आहेत. पण प्रशासकीय कारकिर्दीमुळे संस्थेला नफा झालेला नाही. सभासदांच्या हितासाठी सभासद प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे सेक्रेटरी बाळकृष्ण मगदूम यांनी सांगितले. येथील निपाणी को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटच्या ३६ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जोरापुरे होते. संचालक …

Read More »

निपाणीत करणार १ ऑक्टोबरला ईद -ए मिलाद

  मुस्लिम समाजाचा निर्णय; सामाजिक ऐक्य अबाधित निपाणी(वार्ता) : यंदा मुस्लिम समाजाचा ईद ए -मिलाद पैगंबर जयंती सण गुरुवारी (ता. २८) आहे. याच दिवशी हिंदू बांधवांचा अनंत चतुर्दशी सण आहे. या काळातील एकोपा आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या दृष्टीने येथील मुस्लिम समाज बांधवांनी रविवारी (ता. १ ऑक्टोबर) ईद ए -मिलाद …

Read More »

महापालिकेकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी

  बेळगाव : अनंत चतुर्दशी जवळ आल्याने बेळगाव महापालिकेने विसर्जन मिरवणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरु केली आहे. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची पायी फिरून पाहणी केली आणि सर्व समस्या सोडवण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. पालिका आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज, रविवारी आधी कपिलतीर्थ येथील …

Read More »

आंबेवाडीतील मुलांच्या खो-खो संघाचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश

  बेळगाव : बेळगाव ग्रामीणमधील आंबेवाडी गावातील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. रामदुर्ग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील व सागर सुतार यांनी खो-खो संघाला प्रोत्साहनात्मक म्हणून टी-शर्ट, पॅन्ट व जर्सी दिले तर बेळगाव ग्रामीण भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

समर्थ नगर येथील एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन

  बेळगाव : बेळगावचा एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने “कुंभकर्ण सारखा निद्रा अवस्थेत असलेले आपला हिंदु बांधव” ह्या देखाव्याचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व समिती नेते श्री. रमाकांतदादा कोंडूसकर व डॉक्टर रवि पाटील यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. …

Read More »

रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या तिघांना अटक

  बेळगाव : रेल्वेच्या फिश प्लेट चोरणाऱ्या तिघा जणांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 16 फिश प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. आरपीएफचे निरीक्षक एस. आर. कारेकर, उपनिरीक्षक हर्षराज मीना व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली …

Read More »

नेहरू पी. यू. काॅलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड

  खानापूर : जी. ई. सोसायटी संचलित नेहरू मेमोरियल महाविद्यालय, बिडी, ता. खानापूर येथील विद्यार्थिनींची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत व कसरत करत उत्तम खेळ केला. यामध्ये कु. सुरेखा गिडप्पणावर, विजयालक्ष्मी गाडेकर, कावेरी मालकी, देमक्का हिंडलकर, सरीता भेकणी, राधिका गिडप्पणावर, तेजस्विनी गौडर …

Read More »