Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

निपाणीत शुक्रवारी गुडघेदुखी, कंबरदुखीवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हास्पीटल आणि निपाणी रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, नी रीप्लेसमेंट आजारावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर अंदोलन नगरमधील रोटरी हॉल येथे होणार आहे अनुभवी वैद्य डॉ. सारंग शेटे यांच्या मागदर्शनाखाली शुक्रवारी (ता.१५) सकाळी १० वाजल्या …

Read More »

वडगाव-यरमाळ रस्त्यावर मद्यपींचा हैदोस

  बेळगाव : वडगाव-यरमाळ रस्त्यावर रात्रीच्यावेळी तळीराम तळ ठोकून बसल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. दररोज रात्री अंधाराचा फायदा घेत रस्त्यावर घोळका करून दारू पित बसलेले दिसत आहेत. काही वेळेस मद्यपानासोबत जुगाराचे डाव देखील रंगत आहेत. या मद्यपींचा त्रास या परिसरातील शेतकरी तसेच महिलांना सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे …

Read More »

शॉर्टसर्किटने लाकडाच्या गोडाऊनला आग लागून निपाणीत लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : येथील मुरगुड रोडवरील सुरज हॉटेल जवळ असलेल्या प्रगती ट्रेडर्सच्या लाकडाच्या गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग लागून लाकडी सामानासह संगणक असे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास ही घटना घडली. तात्काळ अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत घटनास्थळासह …

Read More »

नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन 24 तासात द्या

  खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांना निवेदन खानापूर : येथील नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन येत्या 24 तासात करण्यात यावे, अशी मागणी करत खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे …

Read More »

जनता शिक्षण मंडळाच्या माजी विद्यार्थी, पालक संघाची वार्षिक सभा

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळ संचालित देवचंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पालक संघाची वार्षिक सर्वसाधारण पार पडली. यामध्ये विविध विषयांची माहिती देण्यात आली. विद्यार्थी व पालक संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील ससे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सेक्रेटरी प्रा. डॉ आर. के. दिवाकर यांनी मागील …

Read More »

ईद-ए-मिलादची मिरवणूक 1 ऑक्टोबर रोजी; बेळगावातील मुस्लिम समाजाचा महत्त्वपूर्ण निर्णय

  बेळगाव : हिंदु-मुस्लिम ऐक्य, बंधूभाव कायम राहावा आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी 1 ऑक्टोबरला ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगावातील मुस्लिम समाजाने घेतला. यंदा श्री गणेश विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवांची ईद-ए-मिलाद मिरवणूक एकाच दिवशी असल्याने गणेश विसर्जन मिरवणूकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न न येता …

Read More »

नामफलकावर कन्नड भाषेला प्रथम प्राधान्य; कानडीकरणाचा महानगरपालिकेकडून फतवा

  बेळगाव : उच्च न्यायालयाने आदेश बजावूनही सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्याकडे दुर्लक्ष करून सापत्न वागणूक देणाऱ्या महापालिकेने आता व्यापारी आस्थापनांच्या नामफलकांचे कानडीकरण करण्याचा विडा उचलला आहे. दुकानांच्या नामफलकांवर ६० टक्के जागेत कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात यावा, असे पत्रक आयुक्त अशोक दुडगंटी यांनी काढले आहे. स्थानिक लोकांच्या भाषेत व्यवहार …

Read More »

वर्क फ्रॉम होम, नॉट रिचेबल चालणार नाही

  मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना इशारा; जनतेच्या समस्या प्रमाणिकपणे सोडविण्याच्या सूचना बंगळूर : जिल्हा आणि तालुका केंद्रातील अधिकाऱ्यांनी घरून काम करू नये, असे सांगून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून काम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. आज विधानसौध कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. …

Read More »

पीओपी गणेशमूर्ती बनविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

  मंत्री ईश्वर खांड्रे; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा बंगळूर : पीओपी मूर्ती जलस्रोतांसाठी धोकादायक असल्याने अशा मूर्तींची निर्मिती, वाहतूक, विक्री आणि विल्हेवाट पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणपती उत्सव …

Read More »

कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि ज्योतिबा देवस्थानात तूर्तास शस्त्रधारी सुरक्षारक्षक नकोत

  कोल्हापूर : कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई मंदिर) आणि ज्योतिबा मंदिरातील जुने सुरक्षारक्षक काढून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक नेमण्यास मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास नकार दिला आहे. मंदिर ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम हायकोर्टानं कायम ठेवली आहे. काय आहे याचिका? महाराष्ट्र …

Read More »