अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांची माहिती निपाणी (वार्ता) : आडी (ता. निपाणी) येथील श्री. मल्लया डोंगरावरील प्राचीनशिवलिंगावर बुधवारपासून (ता.१३) सूर्योदयानंतर काही वेळातच किरणोत्सवास प्रारंभ होणार आहे. हा वेदांत आणि विज्ञानाची सांगड घालणारा किरणोत्सव सोहळा गुरुवारपर्यंत (ता.२१) चालणार आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन किरणोत्सवाचे अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांनी केले …
Read More »वास्को-निजामुद्दीन रेल्वेत सापडले 8 प्रवासी बेशुद्धावस्थेत; बेळगाव येथील रुग्णालयात दाखल
बेळगाव : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन रेल्वेतून प्रवास करणारे मध्य प्रदेशातील आठ प्रवासी बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोंढा स्थानक सोडल्यानंतर एकाच डब्यातून प्रवास करणाऱ्या आठ प्रवाशांना दोन वेळा उलट्या झाल्या. मग जे झोपले ते कधीच उठले नाहीत. सहप्रवासी जागे झाले पण त्यांनी …
Read More »विराट-राहुलचा डबल धमाका, कुलदीपचा पंच, पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव
कोलंबो : विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या दमदार शतकी खेळीनंतर कुलदीप यादव याने भेदक गोलंदाजी केली. भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 128 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. कुलदीप यादव याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीप यादव …
Read More »‘जनता दला’चे नाव बदलून ‘कमल दल’ करा
काँग्रेसचे विडंबन; धजदची धर्मनिरपेक्षता संपवली बंगळूर : पक्षाऐवजी धर्मनिरपेक्षता विसर्जित! जनता दलाचे नाव बदलून ‘कमल दल’ असे सांगून भाजपसोबत युतीचा प्रस्ताव देणाऱ्या धजदवर काँग्रेसने जोरदार टीका केली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने सोमवारी याबाबत ट्विट केले की, निवडणूक हरल्यानंतर पक्ष विसर्जित करण्याऐवजी त्यांनी धर्मनिरपेक्षता विसर्जित केली. त्यामुळे जनता दल या …
Read More »माझे प्रेतही भाजपात जाणार नाही : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
दुष्काळी तालुक्यांची लवकरच घोषणा बंगळूर : माझे प्रेतही भाजपमध्ये सामील होणार नाही, असे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज स्पष्ट केले. सोमवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द जातीयवादी शक्तींच्या विरोधात गेली आहे आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे विधान मजेदार आहे. सिद्धरामय्या …
Read More »हालशुगरच्या संचालिका गीता पाटील यांचा महादेव मंदिरात सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका गीता सुनील पाटील यांची श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाले आहे. त्यानिमित्त निलांबिका महिला मंडळ आणि जपान मंडळातर्फे श्रावण सोमवारचे औचित्य साधून बसव मल्लिकार्जुन स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बसव मल्लिकार्जुन स्वामीजी यांनी, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात सुनील पाटील व …
Read More »खानापूरसह बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; रयत संघटनेची मागणी
हालगी मोर्चाद्वारे तहसीलदारांना निवेदन खानापूर : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि खानापूर तालुका शेतकरी हसीरू सेना यांच्याकडून तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना खानापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हलगी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या अनुपस्थितीत उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदन स्वीकारले. कर्नाटक सरकारने खानापूर …
Read More »स्वतःच्याच बसखाली चिरडून ७ महिला ठार
तमिळनाडू : देवदर्शनासाठी धर्मस्थळला गेलेल्या सात महिलांचा विचित्र अपघातात मृत्यू झाला आहे. ज्या मिनी बसमधून या महिला देवदर्शनाला गेल्या होत्या. त्याच मिनी बस खाली चिरडून यातील सात महिला ठार झाल्या. ही अपघात दुर्घटना बंगळूर-चेन्नई महामार्गावर सोमवारी (दि.११ सप्टेंबर) पहाटे झाली. तमिळनाडूतील महिलांचा एक गट धर्मस्थळ, उडपी आणि मैसूरच्या सहलीवर …
Read More »‘देवचंदच्या’ छात्र सेना, व्हाईट आर्मीतर्फे सिद्धोबा डोंगरात पदभ्रमंती
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल ) येथील देवचंद महाविद्यालयातील छात्रसेना व व्हाईट आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने पांगिरे-बी येथील सिद्धोबा डोंगरात पदभ्रमंती करण्यात छात्रांच्या शारीरिक क्षमतांचा विकास व पर्यावरण संवर्धनाबाबत जाणीव निर्माण करून देण्यासाठी या एक दिवसीय जंगल पदभ्रमंती आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालय ते सिद्धोबा डोंगर व …
Read More »निलजी येथील ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावच्या रामलिंग देवस्थानास आर. एम. चौगुले यांची भेट
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील जागृत ब्रह्मलिंग मंदिर आणि नावगे गावाच्या रामलिंग देवस्थानाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट दिली. श्रावण मासातील शेवटच्या सोमवार निमित्ताने तालुक्यातील विविध गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आर. एम. चौगुले यानी दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta