निपाणीत हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन …
Read More »महापौर शोभा सोमनाचे यांचे राज्यपालांना पत्र!
बेळगाव : महानगरपालिकेत महापौरांची स्वाक्षरी असलेली फाईल गहाळ त्याचबरोबर नियमबाह्य दुरुस्ती याबाबत प्रशासन आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू होती. या वादाने आता गंभीर वळण घेतले असून महापौर शोभा सोमनाचे यांनी राज्यपालांना पत्र लिहून महानगरपालिकेतील प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी मुदत मागितली आहे. आज महानगरपालिकेत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »आमदार अभय पाटील यांच्या विरोधात दलित संघटनांची निदर्शने
बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या विरोधात विविध दलित संघटनांनी महापालिकेसमोर आज निदर्शने केली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील दलितविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात विविध दलित संघटनांनी आज बुधवारी पालिकेसमोर आंदोलन केले. आमदार अभय पाटील यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचा छळ केल्याचा तसेच, …
Read More »संजय बेळगावकरांच्या आवाहनाला रमाकांत कोंडुसकर यांचे परखड प्रत्युत्तर
बेळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर महापालिकेत सुरू झालेले वर्चस्वाचे राजकारण प्रत्येक दिवशी नवनवे वळण घेत आहे. त्यातच आज बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी, मंत्री जारकीहोळी यांनी बुडाच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचे सांगितले. त्याबद्दल एकाबाजूला चौकशीचे मी स्वागत करतो. मात्र …
Read More »आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू; उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणापासून ते राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर स्पष्ट भाष्य केले. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे ऐकत नसेल तर देशात लोकशाही राहणार आहे की नाही असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला. ज्यांनी पाशवी बहुमत मिळते अशी लोक …
Read More »मराठ्यांना आरक्षण देणारच; एकनाथ शिंदेंचा निर्धार
मुंबई: मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असं …
Read More »महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ
खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर प्रायव्हेट लिमिटेड खानापूर 2023-24 वर्षाचा ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ व मोळी पूजन कार्यक्रम व केन कॅरियरचे पूजन श्री. चन्नबसवदेवरु रूद्रस्वामी मठ बिळकी, यांच्या दिव्य सनिध्यामध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्युत शुभारंभ राज्यसभा सदस्य श्री. इराण्णा कडाडी, तसेच लैला शुगरचे चेअरमन व तालुक्याचे …
Read More »सशस्त्र दलांसाठी बनावट भरतीचा घोटाळा उघड
पोलीस, लष्करी गुप्तचरांकडून पर्दाफाश बंगळूर : पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्सने संयुक्तपणे एका बनावट भरती घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे, ज्याने १५० तरुणांना भारतीय सशस्त्र दलात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन एक कोटी रुपयांची फसवणूक केली होती. चित्रदुर्गातील श्रीरामपुर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी पोलिसांनी भारतीय लष्कराचा वाळवंट असलेला हुबळी येथील रहिवासी ४० …
Read More »सांस्कृतिक नगरी जगप्रसिद्ध जंबो सवारीसाठी सज्ज
म्हैसूर दसरा महोत्सवाची आज सांगता; ‘एअर शो’ला मोठा प्रतिसाद बंगळूर : जगप्रसिद्ध जंबो सवारीची उलटी गिणती सुरू झाली आहे आणि सांस्कृतिक म्हैसूर शहर त्यासाठी सज्ज झाले आहे. मंत्रमुग्ध करणारे दृश्य पाहण्यासाठी लोक आतुरतेने प्रतिक्षा करीत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या दुपारी १:४६ ते २:०८ या वेळेत राजवाड्याच्या गेटजवळ नंदीध्वज पूजन …
Read More »राजे बँकेच्या सभासदांच्या खात्यावर १५% लाभांश जमा
अध्यक्ष एम. पी. पाटील यांची माहिती कागल (प्रतिनिधी) : येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील नफ्यातुन १५% लाभांश जाहीर केला होता. ती सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली. शतकमोहत्सवी वर्षात २५% व दरवर्षी प्रमाणे सतत १५% लाभांश देणारी राजे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta