बेळगाव : मागील दोन वर्षांचा अनुभव बघता यावर्षीही जनतेला पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी प्रशासन पूर्व तयारीला लागले असून 500 निवारा केंद्रे स्थापन करण्यात येणार असून तालुका निहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. वास्तविक दरवर्षी 100 च्या आसपास निवारा केंद्र उभारण्यात येतात पण सध्याच्या कोरोनाच्या काळात पूरग्रस्तांना दाटीवाटीने निवारा केंद्रात ठेवणे धोकाडायक आहे त्यामुळे संसर्ग वाढू शकतो यासाठी खबरदारी म्हणून यावर्षी 500 निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून लवकर सक्रीय होण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन आठवड्यात मान्सून सक्रीय होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात अतिवृष्टी झाल्यास योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
जवळपास 500 गावांना पुराचा धोका असल्यामुळे रहिवाशाना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी 500 निवारा केंद्र उभारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत जेणे करून कोरोना काळात संसर्गजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर योग्य ती वैद्यकीय सुविधा पुरविणे सोईस्कर होईल.
Check Also
ब्रेक फेल झाल्याने मुनवळ्ळी-सौंदत्ती येथे अपघात : दोघांचा मृत्यू
Spread the love सौंदत्ती : सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावाच्या बाहेर क्रूझर वाहनाचे ब्रेक फेल होऊन, …