बेळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीचे औचित्य साधून, श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा वारसा जपण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करा : गजानन निलजकर
या प्रसंगी श्री. गजानन निलजकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, “मराठी भाषा ही आपली ओळख आणि संस्कृती आहे. केवळ वर्षातून एक दिवस गौरव साजरा न करता, आपण आपल्या दैनंदिन वावरात आणि व्यवहारात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने भाषेचे संवर्धन होईल.”
कार्यक्रमाच्या शेवटी आनंद साजरा करण्यासाठी उपस्थित सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी महेश पावले, सुनील केसरकर, सुनील मुरकुटे, अंकुश केसरकर, सुबोध केसरकर, शुभम मोरे, सचिन केसरकर, भाऊ किल्लेकर इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta