Monday , September 21 2026
Breaking News

व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी शाळेत विज्ञान दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : व्ही बी एस एस गर्ल्स हायस्कूल बेळगुंदी या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विज्ञान आणि त्याचे उपयोग यावरती शाळेतील अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले दिशा शहापूरकर व अप्रोज शापुरवाले यांनी विज्ञानाने केलेली प्रगती या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. पूर्वा, अर्चना, सानिका, प्राजक्ता, साक्षी, ज्योती कांबळे, रसिका, अर्पिता, संगीता, अर्चना व अनेक विद्यार्थिनींनी वेगवेगळे प्रयोग सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या गावडा व आभार निर्झरा झंगरुचे हिने मांडले. विज्ञान शिक्षिका संपदा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *