Friday , March 20 2026
Breaking News

कडोलीत रविवारी बांधकाम कामगार युनियनचे उद्घाटन तसेच कामगारांना मार्गदर्शन

Spread the love

 

बेळगाव : कडोली, चलेवनहट्टी, केदनुर, होनगा, आंबेवाडी, आलतगा, आदी विभागातील बांधकाम कामगार युनियनची स्थापन करण्यात येणार आहे. तसेच या उद्घाटन सोहळ्यानिमित्त बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा युनियन संघटनेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी उद्घाटन सोहळ्याला बेळगाव कामगार जिल्हा अध्यक्ष एन. आर. लातूर, जेष्ठ समाजसेवक शिवाजी दादा कागणीकर, कडोली येथील माजी तालुका पंचायत सदस्य उदय सिद्धणावर तसेच कामगार कार्यालयातील अधिकारी उपस्थित उपस्थितीत राहणार आहेत.

यावेळी कामगारांना किंवा त्यांच्या वारसदारांना 18 ते 40 वर्षापर्यंत लागू झालेल्या पेन्शन योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तरी या भागातील कामगारांनी सकाळी 10 वाजता कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पिरनवाडी येथील एकाला गांजा विक्री प्रकरणी अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतून माळ येथे गांजा विक्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *