Monday , September 21 2026
Breaking News

नूतन मराठी विद्यालयात सातवीमधील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नूतन मराठी विद्यालयात विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव विक्रमादित्य धुमाळ, मुख्याध्यापक एस. एस. पचंडी, एम. डी. खोत उपस्थित होते
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. विक्रमादित्य धुमाळ यांनी, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये गुरूंना खूप महत्त्व आहे.‌ स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी जिद्द व चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास यश आपल्यापासून दूर नसल्याचे सांगितले. एस. एस. पचंडी, एस. पी. जगदाळे, एम. डी. खोत, विनायक वाचणे यांच्यासह धनश्री घोडके, समर्थ घोडके, तनया गोडसे, हरिओम लोहार, प्रतीक्षा चौगुले, असद नदाफ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी एस. एस. कुलकर्णी यू. वाय. आवटे, एस. आर. संकपाळ, एस. के जोशी, ए. एम. कुंभार, यू. एम पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. एस. पी. जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. एस. के. जोशी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *