Monday , September 21 2026
Breaking News

मंत्री संतोष लाड यांची भेट घेऊन सुप्रिया पाटील यांची विविध विषयावर चर्चा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या आणि कर्नाटक राज्य महिला जनरल सेक्रेटरी सुप्रिया दत्ताकुमार पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांची बेंगलोर येथे भेट घेऊन निपाणी मतदारसंघातील विविध समस्यावर चर्चा केली. विशेष म्हणजे उन्हाळ्यातील पाणीटंचाई व इतर महत्त्वाच्या बाबीवर त्यांनी प्रकाश झोत टाकला. यावेळी मंत्री लाड यांनी पाणी मतदारसंघाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
भेटीदरम्यान राज्यातील कामगार प्रश्न, स्थानिक पातळीवरील विकासकामे, तसेच निपाणी मतदार संघातील विविध प्रलंबित मुद्द्यांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, जनतेच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे ही भेट फलदायी ठरली असून येत्या काळात निपाणी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासह कामगार वर्गाच्या हितासाठी प्रभावी पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *