बेळगाव : हिंदू नववर्ष व गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आज पहाटेपासून मंदिर परिसरात सनई-चौघड्यांच्या मंगल ध्वनीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या पावन दिनानिमित्त रुद्राभिषेक व पंचांग पूजन विधी पार पडले. त्यानंतर मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे यांच्या हस्ते भव्य गुढी उभारण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष पूजा व आकर्षक आरास करण्यात आली.
संपूर्ण धार्मिक विधी पौरोहित्य नागराज कट्टी यांनी पार पाडले. या प्रसंगी अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजीत चव्हाण, अजित जाधव, रणजीत जाधव, दौलत जाधव, प्रतिक शेळके, शिवशारदुल भातखंडे, निसर्ग चव्हाण, शिवसमर्थ भातखंडे, संतोष हजारे तसेच सेवेकरी व महिला सेवेकरी, ट्रस्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
Belgaum Varta Belgaum Varta