Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात गुन्हेगारीवर पोलिसांचा बडगा; तीन सराईत गुन्हेगार 6 महिन्यांसाठी तडीपार

Spread the love

बेळगाव : शहरातील वाढत्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेत तीन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. मटका, पत्त्यांचा जुगार आणि गांजा विक्रीसारख्या अवैध कृत्यांमध्ये सातत्याने सहभागी असलेल्या तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्फराज शब्बीरअहमद शेख (रा. शहापूर), विनायक प्रकाश कोल्हापुरी (रा. अयोध्यानगर, टिळकवाडी) आणि सागर पांडुरंग सालगुडे (रा. होसुर बसवान गल्ली, शहापूर) यांचा समावेश आहे. या तिघांनी वारंवार गुन्हे करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण केला होता.

सर्फराज शेख याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांत मटका, जुगार व इतर अवैध प्रकारांबाबत तब्बल 16 गुन्हे नोंद आहेत. विनायक कोल्हापुरी याच्यावर गांजा विक्रीसह 5 गुन्हे, तर सागर सालगुडे याच्यावर जुगाराशी संबंधित 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम 55 व 56 अंतर्गत कारवाई करत तिघांनाही जिल्ह्यातून बाहेर काढण्यात आले आहे. 17 मार्च 2026 पासून पुढील सहा महिन्यांसाठी त्यांना विजयपूर, कारवार आणि यादगिरी या जिल्ह्यांच्या हद्दीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *