Monday , September 21 2026
Breaking News

विद्युत भारीत वाहिनीच्या स्पर्शाने मृत्यू झालेल्या ढोणेवाडीतील विद्यार्थ्याच्या वारसाला पाच लाखाची मदत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : शाळेच्या खेळत असताना झाडातून गेलेल्या विद्युत प्रवाहित वाहिनीच्या स्पर्श झाल्याने ढोणेवाडी येथील विद्यार्थी बद्रीनाथ प्रकाश सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता. संबंधित कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी हेस्कॉमकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार सूर्यवंशी कुटुंबीयांना ५ लाख रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला. या रकमेचा धनादेश चिंगळे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
दोन वर्षांपूर्वी १७ मार्चला बद्रीनाथचा (वय १५) हा विद्युत भारित वाहिनीच्या स्पर्शाने मृत्यू झाला होता. त्याचे वडील वडील प्रकाश सूर्यवंशी यांनी १० सप्टेंबर २०२४ रोजी हेस्कॉमकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कार्यवाही होण्यात विलंब होत होता. त्यामुळे चिंगळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून धनादेश सूर्यवंशी कुटुंबीयांना देण्यात आला. याकामी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे सहकार्य लाभल्याचे चिंगळे यांनी सांगितले.
धनादेश वितरण प्रसंगी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, जिल्हा गॅरंटी कमिटी उपाध्यक्ष अमोल बन्ने, ऍड. अविनाश कट्टी, माजी नगरसेवक दीपक सावंत, संदीप चावरेकर, फारुख पटेल, बाळासाहेब कमते, एन. डी. जत्राटकर, अर्जुन कुंभार, इरगोंडा जिगन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *