बेळगाव : वाढत्या उष्णतेने नागरिक त्रस्त असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी जायंट्स ग्रुपतर्फे पाणपोईची सोय करण्यात आली आहे. हलगेकर जनरल स्टोअर्स बसवेश्वर सर्कल खासबाग येथे पाणपोईचे उदघाटन हलगेकर जनरल स्टोअर्सचे मालक कृष्णा हलगेकर, व्यापारी बंधू मंडळाचे अध्यक्ष दिनेश मेलगे, बंडू बामणे, सचिन कणुकले, गदग्याप्पा नागनवर, श्रेयश दश्वी, अनवीत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी पाणपोई ठेवण्यात येणार आहे. पाणपोईसाठी प्रवीण त्रिवेदी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी जायंट्स परिवारचे अध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष (बाह्य) महेश अंम्बोरले, सचिव अजित तडकोड, संचालक दीपक हावळ व फेडरेशन समन्वयक प्रवीण त्रिवेदी व अन्य सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta