Sunday , April 5 2026
Breaking News

बंधुभाव, एकतेचा संदेश देत निपाणी परिसरात रमजान ईद साजरी

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील इदगाह परिसरात अंजुमन कमिटी आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदचा सण शनिवारी (ता.२१) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता ईदगाह परिसरात सामूहिक नमाज पठण करून अल्लाहची प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या आणि बंधुभाव व एकतेचा संदेश दिला.
यावेळी इदगाह परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत येऊन सणाचा आनंद लुटला. आणि समाजातील एकोप्याचे दर्शन घडले. मुस्लिम बांधवांच्या जीवनात रमजान ईद या सणाला विशेष महत्त्व आहे. रमजान महिन्यात एक महिना उपवास (रोजा) पाळल्यानंतर ईद साजरी करण्यात आले. आदल्या दिवशी चांद दर्शन घेऊन मुस्लिम बांधवांनी महिनाभराचा रोजा सोडला. हा सण संयम, त्याग, दया आणि परस्पर प्रेम यांचे प्रतीक मानला जातो. ईदच्या दिवशी गरीब व गरजू लोकांना मदत (जकात व फितर) देण्याची परंपरा असून, समाजातील सर्व घटकांनी आनंदाने सहभागी व्हावे, हा संदेश दिला जातो.
एकूणच निपाणीतील इदगाह परिसरात साजऱ्या झालेल्या या ईद उत्सवाने धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकता आणि बंधुभाव यांचे सुंदर दर्शन दिसून आले. ईद सणाचे महत्त्व जरारखान पठाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले
यावेळी अंजुमन कमिटीचे पदाधिकारी आणि निपाणीतील समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहर आणि उपनगरात पोलिसांनी बंदोबस्त केला होता. दुपारी आणि सायंकाळी मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना ईदच्या जेवणाचे निमंत्रण दिले होते.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *