Sunday , April 5 2026
Breaking News

हॉकी बेळगावतर्फे मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : हॉकी बेळगावतर्फे १ एप्रिल ते ३१ मे पर्यंत मोफत हॉकी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर दररोज ६.३० ते ८.३० या वेळेत हॉकी सराव शिबिर होणार आहे. ‘स्पोर्टस् फॉर लाइफ’ या ब्रीदवाक्यासह मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, उपाध्यक्षा पूजा जाधव, प्रकाश कालकुंद्रीकर, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, प्रशांत मांगले या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे हॉकी खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे. बेळगावातील जास्तीत जास्त मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि हॉकी या राष्ट्रीय खेळात आपले कौशल्य दाखवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हे शिबिर पूर्णपणे मोफत असून, शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी सुधाकर चाळके किंवा उत्तम शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *