Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूरमध्ये 5 एप्रिलला श्री. वसंत हंकारे यांचे व्याख्यान; राम नवमी शोभायात्रेची जय्यत तयारी

Spread the love

 

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर येथील युवा कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. श्री. रमाकांतदादा कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समिती, येळ्ळूर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक (शिवस्मारक) येथे “चला तर जाणून घेऊया आई-बाबांच्या वेदना, आजच्या युवा पिढीला न समजलेला आई-बाप” या विषयावर श्री. वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान होणार आहे.

याच बैठकीत 26 मार्च रोजी होणाऱ्या प्रभु श्रीराम नवमी शोभायात्रेच्या आयोजनाबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले. शोभायात्रा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये वाटप करण्यात आल्या.

बैठकीस गावातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *