Sunday , April 5 2026
Breaking News

6.36 कोटींची मालमत्ता परत केल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थानकडून बेळगाव पोलीस प्रशासनाचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : शहरातील विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत, बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या वतीने प्रॉपर्टी परेड मध्ये तब्बल 6 कोटी 36 लाख 93 हजार 743 रुपयांची मालमत्ता संबंधित फिर्यादींना परत केल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ यांच्याकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक व आभार व्यक्त करत सत्कार करण्यात आला.
2025 वर्षभरात शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये, नोंदवलेल्या दरोडे, साखळी चोरी, घरफोडी व वाहन चोरी प्रकरणांचा सखोल तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केला होता, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय, पीएसआय व गुन्हे शाखेच्या पथकांनी सातत्यपूर्ण तपास करून या गुन्ह्यांचा उलगडा केला.
त्यानुसार 2025 मध्ये दाखल प्रकरणांचा यशस्वी तपास घेण्यात आला आहे, यात 2 कोटी 36 लाख 69 हजार 684 रुपये किमतीचे 2 किलो 332 ग्राम 645 मिली ग्रॅम सोन्याचे दागिने,
13 हजार 59 रुपये किमतीचे 294 ग्रॅम चांदीचे दागिने व 3 कोटी 99 लाख 1 हजार रुपये किमतीचे 85 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत, त्याशिवाय 1 लाख 10 हजार रक्कम ही जप्त केली आहे.
पोलिसांच्या सीईआयआर या पोर्टलद्वारे दाखल झालेल्या मोबाईल चोरी संदर्भामधील तक्रारीपैकी गेल्या वर्षभरात 20 लाख रुपये किमतीचे 140 मोबाईल पोलिसांकडून जप्त केले आहेत, त्यामुळे एकूण 6 कोटी 36 लाख 93 हजार 743 रुपये किमतीची मालमत्ता पोलिसांनी 2025 मध्ये जप्त करून न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मूळ मालकांना परत केली आहे त्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्याकडून बेळगाव पोलीस प्रशासनाचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उमेश बाळू कुऱ्याळकर, श्रीकांत कुऱ्याळकर, युवराज देसाई, प्रशांत जाधव, शिवाजी पाटील, प्रीतम पाटील, नाताजी जाधव, मारुती लोहार, दीपक जाधव, लक्ष्मण कंग्राळकर, विक्रांत सोमनाचे, ज्योतिबा पवार, शुभम बामणीकर, दिनेश लोहार, राम गावडे, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *