Sunday , April 5 2026
Breaking News

कमांडो विंगमध्ये स्विमिंग करत असताना सैन्य अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील नानावाडी येथील कमांडो विंग परिसरात स्विमिंग करत असताना एका सैन्य अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ही घटना ज्युनियर लीडर्स कमांडो विंगमधील स्विमिंग पूलमध्ये घडली. हरियाणाचे रहिवासी लेफ्टनंट अमित सिंह हे स्विमिंग करत असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. ते बेळगाव येथील एमएलआयआरसी कमांडो विंगमध्ये प्रशिक्षण घेत होते, अशी माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात आले. लाईफगार्ड प्रदीप कुमार यांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर या ऍम्ब्युलन्सद्वारे त्यांना बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मार्गात त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *