Sunday , September 20 2026
Breaking News

ज्यूडोमध्ये बेळगावच्या राधिका डूकरेची चमकदार कामगिरी

Spread the love

 

बेळगाव : जिल्ह्यातील धामणे गावची युवा ज्यूडोपटू राधिका डूकरे हिने चंदीगड येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील 70 किलो गटात रौप्य पदक पटकावून बेळगावसह कर्नाटक राज्याच्या नावलौकिकात भर घातली आहे.

चंदीगड येथे गेल्या 18 ते 22 मार्च 2026 या कालावधीत झालेल्या उपरोक्त अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत राणी चन्नम्मा विद्यापीठ कर्नाटकतर्फे खेळताना राधिका हिने प्रारंभपासूनच उत्कृष्ट तंत्रासह आत्मविश्वास पूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. महिलांच्या 70 किलो वजनी गटात तिने पहिल्या सामन्यात किरणदीप कौर (पंजाब विद्यापीठ) हिला पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात कोमल (जीबीएलयू, हरियाणा विद्यापीठ) हिच्या विरुद्ध विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत रितुबेन वाजा (सौराष्ट्र विद्यापीठ, गुजरात) हिला इप्पॉनने पराभूत करत दमदार कामगिरी केली. उपांत्य फेरीत राधिका डूकरे हिने खुशी (चंदीगड विद्यापीठ) हिला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात चाणू (एलएनआयपी विद्यापीठ) विरुद्ध कडव्या झुंजीनंतर तिला पराभव पत्करावा लागला लागला. त्यामुळे ती रौप्य पदकाची मानकरी ठरली.

राधिका डूकरे सध्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव येथे एनआयएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव तिला घरच्यांसह डीवायईएस उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे सततचे प्रोत्साहन लाभत आहे. राधिका हिची उपरोक्त कामगिरी धामणे गाव, राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल, बेळगाव यांच्यासाठी अभिमानास्पद असून जे या भागातील ज्युडो खेळाच्या उज्ज्वल भविष्य अधोरेखित करते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *