Monday , May 25 2026
Breaking News

शहापूर स्मशानभूमीजवळ आत्महत्येचा प्रयत्न टळला

Spread the love

 

शहापूर : शहापूर स्मशानभूमीजवळ रविवारी सकाळी ५ वाजता एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यात आला. एका प्रवाशाच्या व स्थानिक नागरिकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती सुमारे अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ इलेक्ट्रिक पोलवर डोके आपटत होती. सुरुवातीला नागरिकांनी हे वर्तन मद्यधुंद अवस्थेमुळे असल्याचे समजले. मात्र पोलवर मोठ्या प्रमाणात रक्त दिसल्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले.

त्या वेळी तेथून जात असलेले समुपदेशक डॉ. विनोद धबाले यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना सकाळच्या फेरफटक्यावर असलेले माजी नगरसेवक श्री. विजय पाटील यांनी साथ दिली. श्री. पाटील यांनी त्वरित शहापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

आक्रमक अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला डॉ. विनोद धबाले यांनी समजावून सांगत शांत केले आणि जीवनाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर बोलताना डॉ. विनोद धबाले म्हणाले, “आज लोकांना औषधांपेक्षा कोणीतरी ऐकून घेणारा आणि समजून घेणारा माणूस अधिक गरजेचा आहे.” त्यांनी आत्महत्या, नैराश्य, चिंता व भावनिक तणावातून जाणाऱ्या व्यक्तींना मोफत समुपदेशन सेवा उपलब्ध असल्याचेही सांगितले.

पत्ता: डॉ. विनोद यांचे ‘अनुभव वेदिक शाळा’, नाथ पै सर्कल, शहापूर, हेल्पलाईन: 9845646591

About Belgaum Varta

Check Also

सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच अर्जुन गोरल यांना खरी श्रद्धांजली; शोकसभेत मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Spread the love  येळ्ळूर :येळ्ळूर गावचे सुपुत्र व महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ व कणखर नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *