Sunday , April 5 2026
Breaking News

घरफोडीचा छडा लावण्यात मार्केट पोलिसांना यश

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात मार्केट पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका ४० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे ९ लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शिवाजी नगर येथील रहिवासी ललिता प्रकाश ममदापूर यांनी ९ मार्च २०२६ रोजी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरातून २६ डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते.

मार्केट पोलिस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. या तपासादरम्यान संशयित महिला सुरेखा बसवराज तळवार (वय ४०, रा. उप्पार गल्ली, खासबाग, बेळगाव) हिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी महिलेच्या ताब्यातून एकूण ६८.७४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या दागिन्यांची बाजारपेठीय किंमत ९ लाख २७ हजार ९९० रुपये इतकी आहे. या यशस्वी कारवाईत निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, पीएसआय हुसेन केरूर, विठ्ठल हावन्नवर, एएसआय एस. एम. शिंदे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *