Sunday , April 5 2026
Breaking News

महावीर जयंतीमुळे दहावी परीक्षा वेळापत्रकात बदल; तृतीय भाषा विषय पेपर ३० ऐवजी ३१ मार्च रोजी

Spread the love

 

बेंगळूर : राज्यात सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात महावीर जयंतीनिमित्त बदल करण्यात आला आहे. ३० मार्च रोजी होणारे तृतीय भाषा विषयांचे पेपर आता ३१ मार्च रोजी घेण्यात येणार आहेत.

तृतीय भाषा अंतर्गत इंग्रजी, कन्नड, हिंदी, उर्दू, अरबी, संस्कृत, कोकणी, मराठी आणि तुळू या विषयांचा समावेश आहे. कर्नाटक शालेय शिक्षण आणि मूल्यमापन मंडळाने याबाबत गुरुवारी अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले.

यंदाची दहावी परीक्षा १८ मार्चपासून सुरू झाली असून २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार तृतीय भाषा पेपर ३० मार्च रोजी होणार होता. मात्र, २६ मार्च रोजी शासनाने महावीर जयंतीची सुटी ३१ मार्चऐवजी ३० मार्च रोजी जाहीर केल्याने वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, उर्वरित सर्व विषयांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *