Sunday , July 26 2026
Breaking News

पहिलीत प्रवेशासाठी वयोमर्यादेत सवलत; २०२६-२७ साठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Spread the love

 

 

बंगळूर : सहा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलांच्या पालकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक या नियमात २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी सवलत देण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांनी विधानसभेत घोषणा केली.

मंत्र्यांनी सांगितले की, पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक असले तरी यावर्षीही या नियमात ६० दिवसांची (दोन महिन्यांची) सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे ५ वर्षे १० महिने वय असलेल्या मुलांनाही पहिलीत प्रवेश घेता येणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल केले जाणार आहेत. तसेच एलकेजी आणि यूकेजी वर्गांसाठी सध्या कोणतीही ठोस वयोमर्यादा नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या स्तरांवरही वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणण्याचा सरकारचा विचार आहे.

विधानसभेत याबाबत चर्चा करताना आमदार अरविंद बेल्लद यांनी हा प्रश्न दरवर्षी निर्माण होतो, त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली. त्यावर मंत्री बंगारप्पा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच कायदा करून ही प्रक्रिया नियमित केली जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, या बदलासाठी कर्नाटक शिक्षण कायद्यात दुरुस्ती करून पुढील अधिवेशनात विधेयक मांडले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे वयोमर्यादेमुळे आतापर्यंत प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *