Sunday , April 5 2026
Breaking News

महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा टिप्परच्या धडकेत मृत्यू

Spread the love

 

खानापूर रोडवर भीषण अपघात

बेळगाव : शहर स्वच्छतेसाठी पहाटेपासून रस्त्यावर काम करणाऱ्या महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा भरधाव टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी खानापूर रोडवर घडली. मृत कर्मचाऱ्यांचे नाव अक्का कोलकार असे असून त्या बेळगाव महापालिकेत कार्यरत होत्या.

दररोजप्रमाणे त्या शनिवारीही पहाटे शहर स्वच्छतेचे काम करत होत्या. त्याचवेळी खानापूरकडून बेळगावच्या दिशेने वेगाने येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी भरधाव धावणाऱ्या जड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कर्तव्यावर असताना एका कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *