Sunday , July 26 2026
Breaking News

श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर, बेळगाव येथे चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर, बेळगांव येथे चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. चैत्र पोर्णिमा बुधवार दिनांकः 01/04/2026 रोजी सकाळी 6.00 वाजता श्री जोतिबा देवाला अभिषेक, पादपुजा, अलंकार पुजा व आरती तसेच सायंकाळी 8.00 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी अभिषेक व आरतीस उपस्थित राहून शुभाशिर्वाद घ्यावा असे कळविण्यात येत आहे.

तसेच देवदादा सासन काठीचे कोल्हापूरहून सोमवार दि. 06/04/2026 रोजी श्री जोतिबा मंदिर, शिवबसव नगर, बेळगांव येथे आगमन होणार असून त्या निमित्त महाप्रसादाचे आयोजन दुपारी 12.00 ते 4.00 च्या दरम्यान करण्यात आले आहे, तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंदिर वतीने कळविण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *