बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रसेवा दलाचे शिबिर दिनांक 25 मार्च ते 28 मार्च 2026 दरम्यान उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाले. राष्ट्रसेवा दल ही एक स्वयंसेवी संघटना आहे, जी युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता आणि विज्ञानाभिमुखता यांसारख्या मूल्यांची शिकवण देण्यासाठी काम करते. युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जाति-धर्मनिरपेक्षता, समता आणि विज्ञान यांसारखी मूल्ये शिकवणे, शिस्त आणि व्यवस्थापनाला मदत करणे तसेच समाजात समता आणि न्यायाचे वातावरण प्रस्थापित करणे हेच राष्ट्रसेवा दलाचे उद्दिष्ट. ही उद्दिष्टे मुलांमध्ये विद्यार्थीदशेत रुजावीत यासाठी इयत्ता सातवी मुलांसाठी चार दिवसाचे हे शिबिर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन पर्यावरणवादी सर्वोदयी कार्यकर्ते डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांनी केले.
दिनांक 28 मार्च रोजी या कार्यक्रमाचा सांगता समारंभ पार पडला. यासाठी प्रमुख पाहुणे शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते. राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ता सदाशिव मगदूम, बाबा नदाफ, राज कांबळे, शौर्य भोसले, कोमल मगदूम यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, झांज, सामाजिक भान या विषयावर नृत्य सादर केले. तसेच ‘आभाळाची आम्ही लेकरे’ हे प्रार्थना गीत सादर करण्यात आले. युद्ध नको शांती हवी, जे आपण शिबिरात शिकलो ते दैनंदिन जीवनात आचरणात आणून चांगला नागरिक घडविण्याचे ध्येय प्रमुख पाहुणे प्रा. सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. शाळेच्या शिक्षिका सरिता बांदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरामध्ये आनंद चिठ्ठी, समीर मजली, ऋतुजा कोलते, अमिता नायगावकर, राहुल खानोलकर, आनंद मेणसे यांनी बौद्धिक सत्रे घेतली. प्रिया राजपूत, श्रुतिका गुरव, सृजन पाटील, गार्गी मोरे, दर्श घाडी, जिया कांबळे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर पालकांतर्फे कविता राजपूत यांनी शिबिरासंबंधी आपले मत व्यक्त केले. कलाश्री बागेवाडी, साईराज गुरव, गौरव पाटील, अजिंक्य देसाई, रावी कोटबागे, अरहंत चौगुले या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने शिबिरात भाग घेतला. शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील तर शिक्षक अरूण बाळेकुंद्री, स्नेहल बेळगावकर, माया पाटील यांनी सहकार्य केले. चार दिवस शाळेतील कर्मचारी वर्गाने शिबीरात सहभागी मुलांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नाष्टा आणि भोजनाची उत्तम व्यवस्था केली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिक्षिका रूपाली हळदणकर तर आभार नीला आपटे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta