Monday , September 21 2026
Breaking News

हनुमान जयंतीनिमित्त घुमटमाळ मारुती मंदिरात विविध कार्यक्रम

Spread the love

 

 

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदवाडी येथील मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी वारकरी संप्रदाय मंडळ, अनगोळ यांचे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार 2 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता हनुमान मूर्तीला अभिषेक, त्यानंतर कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन, सहा वाजता जन्म काळ व तीर्थप्रसाद होणार असून दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. भक्तांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रकाश माहेश्वरी व ट्रस्टीजनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *