
बेळगाव : 2 मे रोजी जन्मोत्सव आणि 4 मे रोजी चित्ररथ मिरवणूक या वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय झाला. शहापूर विभाग सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता श्री साईगणेश सोसायटीच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी नेताजी जाधव होते.
गेली 2 वर्षे कोरोनामुळे कोणताच उत्सव झाला नाही, मात्र यावर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करूया. उत्सव साजरा करत असताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे नेताजी जाधव म्हणाले.
मिरवणूक मार्गावर ज्या काही अडचणी असतील त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून करून देवू आणि नाथ पै सर्कलमध्ये व्यासपीठ उभारणी करून देवू असे नूतन नगरसेवक नितीन जाधव आणि रवि साळुंखे यांनी सांगितले.
सर्व मंडळांना मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाकडून एकच परवानगी मिळेल. यासाठी प्रयत्न करू, असे महादेव पाटील यांनी सांगितले.
राजू बोकडे यांनी नूतन नगरसेवक रवि साळुंखे व नितीन जाधव यांचा गुलाब पुष्प देवून सत्कार केला.
यावेळी हिरालाल चव्हाण, पी. जे. घाडी, शंकर चौगुले, अशोक चिंडक, गोपाळराव बिर्जे, संदीप जाधव, आप्पाजी बस्तवाडकर, प्रशांत चाकूरकर, श्रीधर मंडोळकर, राजकुमार बोकडे, राजू उंडाळे, श्रीधर जाधव, नारायण केसरकर, मंगेश नागोजीचे, रणजित हावळानाचे, दत्ता पोटे, नवनाथ पोटे, संजय बैलुरकर, दीपक गौंडाडकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta