
बेळगाव : भाजपा ग्रामीणतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळेच आज भारत देश जगामध्ये सर्वश्रेष्ठ लोकशाही म्हणून नांदत आहे. आपल्या समाजामध्ये मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या समाजाची व आपल्या कुटुंबाची प्रगती करावी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करावे असे ते म्हणाले. याप्रसंगी भाजपा सोशल मीडिया प्रमुख डॉक्टर राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन दावले, लक्ष्मी शिंदे, अजय कुरबर, अरुण भोसले, तेजस मेलगे, येतेश हेबाळकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta