
बेळगाव : शांताई विद्या आधारतर्फे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली असून गरजू आणि गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा शांताई विद्या आधारचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन शांताईचे संचालक माजी महापौर विजय मोरे यांनी केले.
बेकवाड, तालुका खानापूर येथील नम्रता देसाई या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी शांताई विद्या आधारतर्फे 21,000/- रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी माजी महापौर विजय मोरे बोलत होते.
यावेळी मोरे यांनी आत्तापर्यंत विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्या शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.
शांताईच्या विद्या आधार योजनेला जीएसटीचे माजी अधिकारी एन. एस. पाटील त्यांनी मदत केली त्यांच्या हस्ते देसाईला धनादेश प्रदान करण्यात आला. संतोष ममदापूर यांनी प्रास्ताविक केले यावेळी रोहन जाधव, रवी चव्हाण, ऍलन मोरे, प्रवीण बिद्रे, शुभम वाघवडेकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta