
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रा यंदा रविवार दि.17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे.
रोज होत असलेल्या पावसाचा विचार करून रथयात्रेच्या वेळेत बदल करण्यात आला असून रविवारी सकाळी 10 वाजता नाथ पै चौक शहापूर येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. तेथून खडेबाजार शहापूरमार्गे बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊन रथयात्रा महात्मा फुले रोड मार्गे गोवावेसकडून इस्कॉन मंदिरावर 1 वा पोहचेल. तेथे विविध कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होईल.
रथ यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे सजविलेल्या काही बैलगाड्या, भगवान श्री कृष्णांच्या जीवनावरील काही देखावे, लेझीम, भजनी मंडळ, भजन, किर्तन करणाऱ्या भक्तांचा समूह आणि रथयात्रेचे समोर प्रभुपाद यांची प्रतिमा असलेली बग्गि यांचा समावेश असेल. वाटेत प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात येणार आहे भक्त समूहाकडून रथावर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून श्री राधा गोकुलानंद मंदिराजवळ रथयात्रा पोहोचल्यानंतर भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन होईल. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन मंडपातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उपस्थित भक्तांना प्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात येणार आहे. भाविकांनी रथयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे
Belgaum Varta Belgaum Varta