किरण जाधव यांची जिल्हा ग्रामीण ओबीसी कार्यकारिणी सभेत ग्वाही
बेळगाव : भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण जिल्हा मागासवर्गीय कार्यकारिणीची सभा बेळगाव ग्रामीण जिल्हा पक्ष कार्यालयात नुकतीच संपन्न झाली.
या सभेला भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बसवराज मळेदवर, राज्य मुख्य सचिव विवेकानंद डब्बी, राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, सतीश शेज्वाडकर, भाजप जिल्हा मुख्य सचिव सुभाष पाटील, संदीप देशपांडे, महेश मोहिते, गुरू मेटगुड यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विचार मांडले. राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी, संघटन बांधणीबरोबरच शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.
याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे अन्य पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, मुख्य सचिव उपस्थित होते.
ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष हडपद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. जिल्हा मुख्य सचिव इरणा बडिगेर यांनी स्वागत केले. तर उमेश पुरी यांनी आभार मानले.