
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित सीमाप्रश्नाच्या खटल्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या खटल्याला गती देता येईल याविषयी महाराष्ट्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
स्वर्गीय एन. डी. पाटील यांच्या पत्नी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सरोज पाटील व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूर येथे सदिच्छा भेट घेतली.
या शिष्टमंडळात मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta