
बेळगाव : पंचायतराज दिनाच्या निमित्ताने उद्या ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरण मोहीम हाती घेतली जाणार आहे.
ग्रामीण विकास आणि पंचायतराज दिनाच्या निमित्ताने उद्यापासून आठवडाभर ग्रामपंचायतीकडून विशेष कार्यक्रम घेतली जाणार आहेत. रविवार दि. 24 एप्रिलपासून ते रविवार दिनांक 1 मे पर्यंत हे कार्यक्रम पार पडणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरण याच्या मोहिमेसह अनेक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अद्याप ही मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांना शोधून किसान क्रेडिट कार्ड करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात येणार आहे.
उद्या असलेल्या ग्राम विकास आणि पंचायतराज दिनाच्या निमित्ताने जिल्हा पंचायत विविध बँकांचे प्रतिनिधी नाबार्ड प्रतिनिधी आणि कृषी खात्याचे अधिकारी यांची बैठक याची सूचना पंचायतराज खात्याने जिल्हा पंचायत केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta