Friday , March 6 2026
Breaking News

नवी गल्ली शहापूर येथे एकोप्यात इफ्तार पार्टीचे आयोजन

Spread the love


बेळगाव : शहापूर नवी गल्ली येथे सर्वधर्म समभावाचे संदेश देत रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
शहापूर नवी गल्ली येथील मशिदी समोर या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर आणि नगरसेवक रवी साळुंके, त्यांच्यासह निमंत्रित पाहण्या म्हणून माजी नगरसेवक नेताजी जाधव, रवी शिंदे, सचिन गुरव, मनीष रामचंदानी, भवानी राजपुरोहित, बँकेचे संचालक सतीश पाटील, परशराम ढगे
अमजद मोमिन, हमीद बागलकोट, अब्दुल बागलकोट, सल्लू पटेल, ईशाद अनगोळकर, बशीर मुल्ला आदी उपस्थित होते.
इफ्तारी मेजवानीपूर्वी आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस अधिकारी बडीगेर, नगरसेवक साळुंखे आणि नेताजी जाधव यांनी समयोचित विचार व्यक्त केले. सध्याची देशातील एकंदर परिस्थिती पाहता जातीय सलोखा किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी विषद केले.
त्याचप्रमाणे नवी गल्ली येथील मुस्लिम बांधवांकडून हिंदू-मुस्लीम जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तसेच याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे सांगितले. या कार्यक्रमानंतर इफ्तारी मेजवानी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *