Friday , October 18 2024
Breaking News

घराची भिंत कोसळून एक कामगार ठार

Spread the love


बेळगाव : इमारतीच्या शेजारील घराची मातीची भिंत कोसळून एक कामगार ठार तर दुसरा कामगार जखमी झाला आहे. बेळगावातील मारुती गल्लीत हि दुर्घटना घडली. बेळगावातील मारुती गल्लीतील मारुती मंदिराच्या मागे असलेल्या वृंदावन हॉटेलजवळ एक भव्य वास्तू तयार होत आहे. इमारतीच्या शेजारी असलेल्या घराची भिंत कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आहे. आणखी एक कामगार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खडेबाजारचे एसीपी चंद्रप्पा, सीपीआय निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढला. कीर्ती लाल हे येथे नवीन इमारत बांधत आहेत. महादेवप्पा असे मृत कामगाराचे नाव असून तो बैलहोंगलचा आहे. या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती म्हणाले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर बेसमेंट तयार करून इमारत बांधणे चुकीचे आहे. कारण तिथे मातीची, दगडी भिंतींची घरे आहेत हे पहायला हवे होते. पालिका सदस्य म्हणून, बांधकाम परवानगी देताना सर्व गोष्टींची तपासणी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आमदारही घटनास्थळी भेट देणार आहेत. मृतदेह मृताच्या घरी पाठवण्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करू असे त्यांनी सांगितले. खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *