Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे सन्मानित

Spread the love


बेळगाव : बेळगावात पत्रकार क्षेत्रात योगदान दिलेले निवृत्त ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना त्यांनी बजावलेल्या सेवेसाठी बेळगाव जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्यावतीने दर रविवारी एका ज्येष्ठ पत्रकाराचा सत्कार करण्यात येतो त्याअंतर्गत जिल्हा अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी सत्कार केला.
बेळगावात 35 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या प्रशांत बर्डे यांनी रणझुंझार या मराठी दैनिकातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती आणि पुढारी या मराठी दैनिकात सलग 23 वर्षे काम करत ब्युरो चीफ म्हणून सेवा निवृत्त झाले होते. बेळगावातील मराठी पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल कार्यनिर्वाहक पत्रकार संघाने त्यांचे भाषा भेद विसरून सत्कार केला.
कार्यनिर्वाहक संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे आणि सचिव अरुण पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
बर्डे सध्या आजारी असल्याने घरी विश्रांती घेत असतात. कर्नाटक शासनाकडून निवृत्त पत्रकारांना मिळणारी पेन्शनची सवलत अद्याप मिळत नाही. ते या सुविधेपासून वंचित आहेत त्यांना शासनाची पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिलीप कुरुंदवडे यांनी दिले.
पत्रकारितेच्या जीवनात त्याकाळी आपण कोणत्या पद्धतीने पत्रकारिता केली याचे अनुभव प्रशांत बर्डे यांनी यावेळी कथन केले.
यावेळी पत्रकार प्रकाश बेळगोजी, रमेश हिरेमठ, कुंतीनाथ कलमनी, रवी उप्पार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *