Thursday , March 5 2026
Breaking News

फर्स्ट इंडिया स्केट रोलर गेम्स -2022 मध्ये बेळगावचे स्केटिंगपटू चमकले

Spread the love

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित फर्स्ट इंडिया स्केट रोलर गेम्स स्केटिंग चॅम्पियनशिप- 2022 या स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी सुयश मिळविले.

चंदीगड पंजाब मधील मोहाली येथे 21 ते 30 एप्रिल 2022 या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे 1900 स्केटिंगपटू सहभागी झाले होते. यामध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी 1 रौप्य पदक आणि 3 कांस्य पदके मिळविली.

फ्री स्टाइल स्केटिंग प्रकारात अवनीश कोरीशेट्टी याने एक रौप्य तर देवेन बामणे याने दोन कांस्यपदके पटाकविली. तसेच डाउनहिल स्केटिंग प्रकारात शुभम साखे याने एक कांस्यपदक मिळविले.

या स्पर्धेत सुयश मिळवलेले हे स्केटिंगपटू केएलई सोसायटी संचालित लिंगराज महाविद्यालय स्केटिंग रिंक, गोवावेस येथील रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंक तसेच गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचा सराव करत आहेत. या स्केटिंगपटूंना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *