Friday , March 6 2026
Breaking News

नूतन जिल्हाधिकार्‍यांचे श्रमिक पत्रकार संघाकडून स्वागत

Spread the love


बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे शनिवारी सत्कार करून स्वागत करण्यात आले.
राज्य सरकारने बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांची बदली केल्यानंतर नितेश पाटील यांनी नवीन जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. त्यामुळे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकार्‍यांनी नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली.
यावेळी कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, उपाध्यक्ष राजशेखर पाटील, सुरेश बाळोजी, श्रीकांत कुबकड्डी, राजकुमार बागलकोट्टी, एस. एस. मठद, अरुण पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *