Thursday , March 5 2026
Breaking News

सकल मराठा समाजाने आपली भूमिका स्पष्ट करावी : म. ए. समितीचे आवाहन

Spread the love

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सुकाणू समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण श्री. दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सध्या बेळगाव शहर आणि परिसरात सकल मराठा समाज संघटना मराठा समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. म. ए. समितीचे पदाधिकारी आणि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांच्यातही याबाबत चर्चा झाली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी आणि मराठा समाजाच्या मागण्या भिन्न आहेत. सीमाभागातील मराठा समाज आपल्या मातृभाषेच्या राज्यात विलीन होण्यासाठी झगडत आहे. कर्नाटक सरकारने कोणत्याही सवलती देऊ केल्या तरी येथील समाज कर्नाटकात राहू इच्छित नाही. उर्वरित कर्नाटकातील मराठा समाजाच्या मागण्या आणि प्रश्न भिन्नआहेत सकल मराठा समाज यासाठी जे प्रयत्न करत आहे त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणच नाही. सकल मराठा समाजाने सीमाप्रश्न आणि मराठी भाषिकांचे प्रश्न याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी म्हणजे कार्यक्रमाबाबत निर्णय घेणे सोपे जाईल, असे आवाहन म. ए. समितीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *