
बेळगाव : बेळगावसह परिसरात बहुसंख्य मराठा समाज आहे. तो सर्वत्र विखुरलेला आहे. मात्र आता हाच मराठा समाज एकवटत आहे. आपल्या समाजाच्या विकासासाठी एकसंघ होत आहे. मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी सकल मराठा समाजाचे नेते सज्ज झाले आहेत. त्यांनी दिलेल्या आवाहनाला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या 15 मे रोजी मराठा समाजाच्यावतीने गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रसह अनेक भागातून मराठा समाजातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमास समाज बांधव बहुसंख्येने संघटित होतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी सभा घेऊन जनजागृती करण्यात येत आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळत असून या कार्यक्रमात महिलांसह आबालवृद्ध स्वयंस्फूर्तीने सहभागी होतील असे चित्र दिसत आहे.
बेळगावातील समितीच्या माजी नगरसेवकांनी देखील आपला पाठिंबा दर्शविला असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहेत. नुकताच कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांचीही भेट घेऊन त्यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने 15 मे रोजी शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पारंपरिक वाद्य, झांजपथक, ढोलपथक, तसेच भजनी मंडळांचाही समावेश असणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta