Saturday , October 19 2024
Breaking News

मराठा एकता एक संघटनेचे राज्य मराठा विकास महामंडळाला निवेदन

Spread the love

बेळगाव : आज रविवार दिनांक 15/05/2022 रोजी कर्नाटक राज्यातील मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. एम. जी. मुळे यांचे बेळगावमध्ये मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर मराठा एकता एक संघटन बेळगाव अध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सर्व पदाधिकारी या सर्वांसमवेत श्री. एम. जी. मुळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सरकारकडून मराठा प्राधिकरणासाठी आलेल्या 50 करोड या रकमेचे नियोजनबद्ध दृढीकरण करण्यात यावे. कारण आपल्या बेळगाव जिल्ह्यातील सीमावासीय मराठी भाषिक जनसमुदाय हा सर्वस्वरित्या हर एक स्थानिक हक्कापासून विकासिक सुविधेपासून जसे की शैक्षणिक, व्यवसायिक, वैद्यकीय, शासकीय, शेतकरी, नोकरदार, कामगार या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपला मराठा समाज कुठेतरी मागासलेला आहे आणि हर एक सुविधेपासून वंचित पीडित राहिलेला आहे. या सर्व बाबी एम. जी. मुळे यांच्या निदर्शनाला आणत मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने विकासिक तळमळीने आज त्यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित आपल्या संघटनेचे अध्यक्ष नारायण झंगरूचे, जनरल सेक्रेटरी अमोल जाधव, जिल्हाध्यक्ष वैभव कदम, संयोजक नाथाजी मरगळे, संजय पाटील, मोनाप्पा भास्कळ, राजकिरण नाईक, रोहित चोपडे, सुभाष पाटील, मनोहर पाटील, विजय कुन्नूरकर, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी कणगुटकर आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकारी सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *