Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद

Spread the love

बेळगाव (वार्ता) : सीमाप्रश्‍न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळे
सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर सौ. रेणु किल्लेकर यांनी व्यक्त केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या पत्रांच्या मोहिमेला पाठिंबा देत माळी गल्लीतील कार्यकर्त्यांनी महिलानी व मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली आहेत. खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या एक पत्र सीमाप्रश्नासाठी या उपक्रमाला पाठिंबा देवून माळी गल्ली विभागातून पत्रे पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित माजी महापौर सौ. रेणु किल्लेकर मेघन लंगरकांडे, रविंद्र जाधव, अक्षय पाटील, विनोद लोहार, अर्जुन शिंदे, मनिषा काकडे, लक्ष्मी वांद्रे, स्मिता लंगरकांडे, प्रभाकर बामनेकर, सुजाता शिंदे, भाऊराव चौगुले आदी गल्लीतील नागरिक व महिला मंडळ यांच्या उपस्थित पत्रे पाठविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *