बेळगाव : श्री विघ्नहर्ता गणेश मंदिर एस. व्ही. रोड अनगोळ श्रीं चा 24 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी गणेश पूजा व गणहोम करून सुरुवात करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी समाजसेविका माधुरी जाधव यांनी कोरोना काळात केलेले कार्य आणि आताही करत असलेली समाजसेवा याचा थोडक्यात परिचय करून त्यांचा मंदिराच्यावतीने श्रीमती माधुरी मन्नोळकर यांच्या हस्ते शाल, पळकरडी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर माधुरी जाधव यांनी श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या ट्रस्टचे व मंडळाचे आभार मानले. यावेळी मंदिर कमिटी श्री. बाळकृष्ण बिरजे, श्री. रमेश हनमशेठ, बाळू परीट, तुषार तहसीलदार, शशिकांत शानभाग, महादेव लोहार, सुरज लोहार, प्रशांत जाधव, गजानन लोहार व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …