
बेळगाव : येळ्ळूरमधील सांबरेकर गल्लीतील नाला पावसाळा चालू होण्याआधी स्वच्छ करण्यात आला. कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेला नाला येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्या भागातील ग्राम पंचायत सदस्याना बरोबर घेऊन नाला स्वच्छ केला व गावातून शेतात जाण्यासाठी रस्ता केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य रमेश मेनसे, पिंटू चौगुले, शिवाजी नंदुरकर, राकेश परीट, परशराम पारिट, पिडिओ अरुण नाईक व पंचायत अधिकारी, गल्लीतील नागरिक यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta