बेळगाव : मान्सूनपूर्व पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाणी पातळी एक इंचाने वाढ झाली आहे. पाऊस असाच कायम राहिला तर पुढील चोवीस तासात जलाशयाची पातळी एक फुटांनी वाढेल अशी माहिती पाणीपुरवठा व मंडळाकडून मिळाली आहे.
राकसकोप जलाशयातील पाणलोट क्षेत्र महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यात आहे. गेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात 55 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जलाशयात काही प्रमाणात इनफ्लो सुरू झाला आहे.
मान्सूनला अद्यापही सुरुवात झाली नसली तरीही मान्सूनपूर्व पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा महामंडळासह एल अँड टी कंपनीची काही प्रमाणात चिंता दूर झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राकसकोप जलाशयाची पातळी दोन फुटांनी जास्त आहे.
Belgaum Varta Belgaum Varta