बेळगाव : शहर उपनगर परिसरात रहदारी पोलीसांची कारवाई नेहमीच पाहायला मिळत असते. मात्र आज गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि उपनगरातील एकूण बारा ठिकाणी रहदारी पोलिसांनी अचानकपणे वाहनधारकांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे वाहनधारकांची एकच तारांबळ पाहायला मिळाली.
शहर उपनगरातील विविध महत्त्वाच्या चौक आणि रस्त्यांवर रहदारी पोलिसांनी आज अधिकाऱ्यांसह ठिय्या मांडलेला दिसून आला. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांकडून कागदपत्रे तपासणी केली जात होती. त्याचबरोबर विना हेल्मेट, विना सीट बेल्ट तसेच रहदारी नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली.
एरवी कधीही न दिसणाऱ्या ठिकाणी आज रहदारी पोलीस अचानक पणे प्रकट झाले. त्यामुळे सुसाट वाहने हाकणारे आणि रहदारी नियम धाब्यावर बसवणार्या वाहनचालकांना आज चांगलाच चाप बसला. दरम्यान रहदारी पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळाल्याने अनेक वाहनधारक आडमार्गाने आपला मोर्चा वळवताना दिसत होते.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …